इंद्रायणीनगरमध्ये ‘रास गरबा दांडिया’ उत्साहात; नवदुर्गाचा सन्मान
![In Indrayaninagar 'Ras Garba Dandiya' in excitement; Honor of Navadurga](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Londe-e1664611158730-780x470.jpeg)
पिंपरी : राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान आयोजित भव्य नवरात्रोत्सव २०२२ नागरिकांचा रासगरबा दांडिया स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला नागरिकांनी रासगरबा दांडिया चा मनमुराद आनंद लुटला तसेच मनोरंजन नगरीचा लहान मुलांनी व कुटुंबानी आनंद घेतला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणा मध्ये चौथा दिवस पार पडला.
यावेळी माजी नगरसेविका नम्रता लोंढे, युवा नेते योगेश लोंढे यांच्यासह परिसरातील नागरिक माता- भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित होत्या. दरम्यान, दांडिया आणि रासगरबा स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या जोडीला आकर्षक चषक देवून सन्मानित करण्यात आले.
माजी नगरसविका नम्रता लोंढे म्हणाल्या की, दोन वर्षांच्या कोविड संकटानंतर यावर्षी नवरात्रोत्सोव उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, आमचे मार्गदर्शक आमदार श्री. महेशदादा लांडगे यांना मातृशोक झाला. त्यामुळे सुरवातीचे काही दिवस आम्ही उत्सव साजरा केला नाही. त्यानंतर आता नवदुर्गा सन्मान आणि उत्सावाचे पूर्वनियोजित कार्यक्रम सुरू आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Londe-5-1.jpeg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Londe-4.jpeg)