breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा शहरात नसणे ही खेदाची बाब’; इम्रान शेख

राष्ट्रवादी शरद पवार गट; महात्मा गांधींचे स्मारक पिंपरी येथे उभारण्याची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उद्योग नगरी म्हणून देशाच्या नकाशावर पोहचले आहे.या शहराचे देशात आणि जगात एक वेगळे महत्त्व आहे. एकीकडे देश आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरात अजूनही देशाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा एक पुतळा देखील नाही ही शहरासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले”महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य तर मिळवून दिलेच पण त्याचबरोबर जगाला अहिंसेचा विचार दिला.येत्या २ ऑक्टोबर २०२३ ला आपण राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची १५४ वी जयंती साजरी करणार असून जगातील प्रत्येक देशात महात्मा गांधींचे स्मारक आहेत.अगदी अलीकडे दिल्ली येथे झालेल्या G20 परिषद साठी उपस्थित असलेल्या सर्व विविध देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी राजघाट येथील महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे.

हेही वाचा – ‘रोहित पवारांना बजावलेल्या नोटीसीचे उत्तर नागरिक निवडणुकीत देतील’; तुषार कामठे 

पिंपरी चिंचवड सारख्या ऐतिहासिक शहरात गांधीजींचा पुतळा नसणे हि मोठी खेदाची बाब आहे. तरी महापालिकेने या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून पिंपरी चिंचवड शहरात महात्मा गांधीजींचे भव्य स्मारक उभे करणेबाबत कार्यवाही करावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त/प्रशासक डॉ शेखर सिंग यांना दिले आहे. तसेच २ऑक्टोबर २०२४ पूर्वी शहरात महात्मा गांधीचे स्मारक उभे केले जावे अशी मागणी यावेळी इम्रान शेख यांनी केली.

यावेळी शहर सचिव ऋषिकेश गारडे, जावेद शेख, नागेश्वर ससाने, रजनीकांत गायकवाड विशाल शिरसागर संतोष कदम, महेश यादव हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button