Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शिवतेज नगर परिसरातील वाढलेली झाडे जुडपे, वेली तात्काळ काढा
- हेल्प सोशल फाउंडेशनची महापालिकेकडे मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
चिंचवड येथील सेक्टर नंबर १८ शिवतेज नगर परिसरातील विठ्ठल मंदिरजवळ असलेल्या मोकळ्या मैदानाच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात झाडे जुडपे, वेली वाढली आहेत. यामुळे येथे साप तसेच इतर कीटक यांचा वावर वाढला आहे. यामुळे मैदानावर खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना याची बाधा होऊ शकते. त्यामुळे येथील वाढलेली झाडे झुडपे, वेली उद्यान विभागाने तात्काळ काढून घ्यावीत अशी मागणी हेल्प सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन कांबळे यांनी महापालिकेला निवेनाद्वारे केली आहे.
चिंचवड येथील सेक्टर नंबर १८ शिवतेज नगर परिसरात विठ्ठल मंदिर असून याठिकाणी मोकळे मैदान आहे. परिसरातील अनेक लहान मुले याठिकाणी मैदानी खेळ खेळण्यासाठी येत असतात. तसेच अनेक खेळाडू याठिकाणी सराव करण्यासाठी येत असतात. परंतु या मैदानाच्या आजूबाजूला झाडे झुडपे, वेली मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी सरपटणारे जीव तसेच साप आदी अनेकदा या ठिकाणी वावर करताना दिसले आहेत. तसेच एमएसइबीचा डीपी देखील याच ठिकाणी असल्यामुळे भविष्यात शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्यान विभागाने तात्काळ येथील वाढलेली झाडे झुडपे, वेली काढून मैदान मोकळे करून द्यावे.