breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पात्र असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना तात्काळ बढती द्या – पिंपरी युवासेना

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कामास असलेल्या कर्मचा-यापैकी अनेक कर्मचारी हे बढतीस पात्र असून देखील त्यांना बढती दिलेली नाही. त्यांना एकाच पदावर वर्षानुवर्षे काम करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर व एकूणच कामकाजावर परिणाम दिसून येत आहे. सर्वोच्च्य न्यायालय व उच्च न्यायालय यांचे निर्णय देखील अशा कर्मचा-यांच्या बाजूने आहेत. तरी देखील त्यांना बढतीमध्ये डावण्यात येत आहे. तरी, दिनांक ७ मे २०२१ रोजीच्या शासन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून पात्र कर्मचा-यांना बढती देण्यात यावी, असे निवेदन पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button