पिंपरी / चिंचवड

पार्लमेंट ते पालिका एकाच विचाराची सत्ता असेल, तर विकासकामांना गती!

मिशन–PCMC : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची भूमिका

पिंपरी-चिंचवड | आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन–PCMC’ अंतर्गत भाजपकडून प्रचाराला वेग आला असून, पार्लमेंटपासून ते महानगरपालिकेपर्यंत एकाच विचारांची सत्ता असेल, तर शहराच्या विकासकामांना निश्चितच गती मिळते, असे प्रतिपादन भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी केले.

प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपा–आरपीआय (आठवले गट) युतीचे अधिकृत उमेदवार शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, संदेश काटे, अनिता संदीप काटे आणि कुंदाताई संजय भिसे हे चौघेही निवडणूक रिंगणात असून, संपूर्ण प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रचाराच्या माध्यमातून आजवर झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.

हेही वाचा –  विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपा पुन्हाचा निर्धार!

पिंपरी-सौदागर परिसरातील विविध सोसायट्यांना दिलेल्या भेटीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या पाणीपुरवठा, खराब रस्ते, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, उद्यानांची देखभाल आदी समस्यांवर चर्चा केली. प्रत्येक प्रश्न महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून मार्गी लावण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

निवडणूक काळापुरते राजकारण न करता सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहून काम करणारी ही टीम असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. महिलांपासून ज्येष्ठ नागरिक व युवकांचा या संवादात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“ पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्रमांक २८ सह पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण आणि संतुलित विकास हाच आमचा अजेंडा आहे. नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे, प्रत्येक समस्या ऐकून घेऊन ती मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रशासनाशी समन्वय साधत सातत्याने काम करीत आहोत, विकास हा शब्द नुसता घोषणापुरता न ठेवता तो प्रत्यक्षात दिसेल, याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यामुळे भाजपाचा विजय निश्चित आहे.

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, उमदेवार, भाजपा, प्रभाग- 28.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button