breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

मला भेटायला यायचं होतं पण पप्पांनी आणलं नाही…. !

नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या मुलीसोबत देवेंद्र फडणवीस यांचा संवाद

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या चिमुकलीसोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला. त्यावेळी केंदळे यांच्या मुलीने फडणवीस यांच्याकडे ‘मला भेटायला यायचं होतं. पण पप्पांनी आणलं नाही’ अशी गोड तक्रार केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड शहराचा दौरा केला. यावेळी नगरसेवक उत्तम केंदळे आणि अन्य नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले. त्यावेळी नगरसेवक केंदळे यांच्या मुलीला देवेंद्र यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा असल्याचे त्यांनी फडणवीस यांना सांगितले. त्यावर फडणवीस यांनी केंदळे यांच्या मुलीचा हट्ट पुरवला.

नगरसेवक उत्तम केंदळे यांनी व्हिडीओ कॉल वरून त्यांची चिमुकली आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा संवाद करून दिला. फडणवीस यांनी केंदळे यांच्या मुलीची विचारपूस करत तिच्याशी गप्पा मारल्या. त्यावर केंदळे यांच्या मुलीने ‘मला भेटायला यायचं होतं पण पप्पांनी आणलं नाही…’ अशी तक्रार फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर आपण पुढच्या वेळी भेटू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

याचा व्हिडीओ फडणवीस यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. ‘मला भेटायला यायचं होतं पण पप्पांनी आणलं नाही…. !’ असे गोड शीर्षक देखील दिले आहे. हा व्हिडीओ सध्या जोरात व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते आमचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी माझ्या मुलींसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचा हट्ट पुरविला. तसेच लवकरच भेटण्यासाठी बोलविले आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून कार्यकर्त्यांचे हट्ट पुरविणाऱ्या साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद, असे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button