ट्रक दुचाकीच्या भीषण अपघात पती-पत्नीचा जागीच मृत्यू, चालक फरार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/accident-helpline.png)
पिंपरी चिंचवड | बारामती मध्ये भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याने ही घटना घडली. काळुराम गणपत लोंढे आणि साखुबाई काळूराम लोंढे अशी मृत्युमुखी पडलेल्या दांपत्याची नवे आहेत. अपघातानंतर ट्रकचालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. बारामती पाटस रस्त्यावरील सोनवडी सुपे फाट्यावर ही घटना घडली.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, काळूराम लोंढे हे दुचाकीने पत्नीसह जात होते. त्याच वेळी गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाटस कडून बारामती कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली आणि चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील लोंढे दाम्पत्य जागीच ठार झाले. घटनेनंतर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अपघातात मृत्युमुखी झालेल्या काळे दाम्पत्याने हेल्मेट घातले नव्हते. तर ट्रक चालकाने देखील वेगावर नियंत्रण ठेवले नव्हते. ट्रकचालकाने मर्यादित वेगात वाहन चालवले असते तर हा अपघात घडला नसता आणि दोघांचाही जीव वाचला असता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.