breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मागन्या मान्य केल्या जात नसल्यामुळे वायसीएममधील नर्सचे मंगळवारी आंदोलन

पिंपरी / महाईन्यूज

गेली १२ वर्षापासून प्रशासकीय अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील मानधनावर काम करणा-या स्टाफ नर्स यांनी प्रशासनाच्या विरोधात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या न्याय मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

वायसीएममध्ये मानधन तत्वावरील कर्मचा-यांना कायमस्वरुपी सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याबाबतचा ठराव महासभेने मंजूर केला. मात्र, त्याची अंमलबजावणी आजपर्यंत केली गेली नाही. ठरावानुसार मानधनवाढ देण्याऐवजी फुब्रुवारी 2021 पासून मानधनातील 2000 रुपये रक्कम कमी केली गेली. त्यामुळे संतापलेल्या नर्सनी प्रशासनाच्या निषेधार्त 15 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.  जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button