अयोध्या श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त भोसरी येथे मानवी साखळी
भाजपाच्या कविता भोंगाळे-कडू यांचा पुढाकार : भोसरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![Human chain at Bhosari on the occasion of Ayodhya Shree Ram Lalla Pranapratistapana ceremony](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Kavita-Bhongale-Kadu-780x470.jpg)
पिंपरी | अयोध्या येथील श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपूर्ण जगभर साजरा करण्यात आला असून भोसरी परिसरातील संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज मंदिरासमोर मानवी साखळीच्या स्वरूपात सुमारे ९००० नागरिकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहण्यास मिळाला. व सर्वांनी माणूस साखळी द्वारे रामरक्षास्तोत्र मनात संपूर्ण परिसर राममय व भगवा झाला.
मानवी साखळीच्या आयोजन हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कविता भोंगाळे-कडू यांनी भोसरी परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक वर्ग तसेच परिसरातील नागरिक यांचा कार्यक्रमात सहभाग घेत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित झाले. यामध्ये माजी नगरसेवक विकास डोळस, सागर गवळी, विजय भोसुरे, प्रदीप पवार व सर्व भोसरीकर उपस्थित होते.
हेही वाचा – मनोज जरांगे यांची पदयात्रा आज पिंपरी-चिंचवड शहरात, वाहतुकीत मोठा बदल
यावेळी बोलताना कविता भोंगाळे म्हणाल्या की, प्राणप्रतिष्ठेचा हा आनंदाचा अपूर्व असा क्षण आहे. संपूर्ण देश आणि संपूर्ण जग सजले आहे. मंदिर बांधण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यांचे बलिदान सार्थक झाले आहे.