breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगर येथे नवरात्रौत्सव २०२३ ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

माजी नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे यांचा पुढाकार

पिंपरी : राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान इंद्रायणीनगर, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे यांच्या वतीने आयोजित भव्य नवरात्रौत्सव २०२३ उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा नवरात्रोत्सव आयोजित केला जातो. यंदाही त्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त आयोजित सामुदायिक दुर्गासप्तशती पाठ पठणामध्ये १७८ महिलांनी सहभाग घेतला. सहभागी महिलांचा सन्मान करण्यात आला.

दरवर्षी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी विविध स्तुत्य उपक्रम राबविण्या आल्याचे आयोजकांनी सांगितले. सप्तमीला प्रभागातील महिला भगिनींच्या वतीने सामुदायिक दुर्गासप्तशती पाठ पठण आयोजित केला होता. त्यामध्ये १७८ महिलांनी सहभाग घेतला. त्यावेळी त्या सर्व महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. २०२३ च्या गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना या वेळी बक्षीस वाटप करण्यात आले. यामध्ये सुचेता इनामदार, संगिता डुंबरे, वृषाली राऊळ, नलिनी चव्हाण यांना अनुक्रमे प्रथम, द्वीतीय, तृृतीय आणि चतुर्थ क्रमांक देण्यात आला.

हेही वाचा – हळदीचे दूध शरीरासाठी जेवढे चांगले आहे तेवढेच आहे घातक, वाचा सविस्तर..

या उत्सवादरम्यान प्रत्येक दिवशी प्रभागातील सर्व सोसायटीमधील नागरिकांना आरतीसाठी निमंत्रित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच प्रभागातील महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागरिकही तल्लीन होऊन सहभागी झाले. हिंदुत्वाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने शिववंदना घेण्यात आली. परिसरातील नागरिक, लहान मुलांच्या आनंदासाठी मोठे पाळणे, ड्रॅगन, बोट, ब्रेक डान्स आदी खेळाची सुविधा देण्यात आली होती. त्याचा नागरिकांनी सहकुटुंब आनंद घेतला. अष्टमीच्या दिवशी होम हवन झाले. या वेळी आमदार महेश लांडगे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शेवटच्या दिवशी कामगार नेते सचिन लांडगे, कार्तिक लांडगे यांच्या हस्ते सलग नऊ दिवस उत्कृष्ट रासगरबा दांडिया खेळणार्‍या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धकांना टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

दिवसाकाठी १५ हजार नागरिकांची नोंद

रासगरबा, दांडिया, विविध खेळांची स्पर्धा आदीसह विविध स्तुत्य उपक्रम राबविल्यामुळे नवरात्रोत्सव कार्यक्रमात भोसरी परिसरातील नागरिक आपली उपस्थितीत लावत होते. त्यामुळे या उत्सवाची रंगत वाढली होती. दिवसाकाठी सुमारे १५ हजार नागरिकांची नोंद होत होती. भेट देणार्‍यांची संख्या मोठी असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button