ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
फुगेवाडीत घर कोसळले, ढिगाऱ्याखाली अडकलेली 13 वर्षांची मुलगी पौर्णिमा मडकेला सुखरूप बाहेर काढण्यात यश
![House collapses in Phugewadi, 13-year-old girl Pournima Madke rescued](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/IMG-20210828-WA0007-e1630132379913.jpg)
पिंपरी चिंचवड | फुगेवाडी येथील 1972 सालचा देवकर यांचा वाडा कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. घराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली 13 वर्षांची मुलगी पौर्णिमा मडके हिला सुखरूप बाहेर काढले आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आज शनिवारी (दि.28) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.