श्रीनगर मधील हॉटेल मॅनेजरने पिंपळे सौदागर मधील महिलेस पाठवले अश्लील व्हिडीओ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/social-media.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
श्रीनगर गढवाल येथील हॉटेल श्रीकोट केस्टल या हॉटेलच्या मॅनेजरने पिंपळे सौदागर येथील एका महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून तिचा विनयभंग केला. पीडित महिला श्रीनगर येथे कामानिमित्त केली असता तिने हॉटेलमध्ये रूम घेण्यासाठी तिचा नंबर आरोपी मॅनेजर सोबत शेअर केला होता. हा प्रकार 11 मार्च रोजी रात्री पावणे दहा वाजता घडली.
हॉटेल श्रीकोट केस्टल, श्रीकोट गंगानाली श्रीनगर गढवाल येथील मॅनेजर चमोली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ऑगस्ट 2021 मध्ये कामानिमित्त श्रीनगर येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्या हॉटेल श्रीकोट केस्टल या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये रूम घेण्यासाठी त्यांनी हॉटेल मॅनेजर आरोपी चमोली याला त्यांचा नंबर दिला होता. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने 11 मार्च रोजी रात्री पीडित महिलेच्या व्हाट्सअप वर अश्लील व्हिडीओ पाठवून त्यांचा विनयभंग केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.