पिंपरी / चिंचवड

कारला धडक देऊन कार चालकाला मारहाण करत कार पळवली; दोघांना अटक

पिंपरी | प्रतिनिधी

दोघांनी एका कारला त्यांच्या कारने समोरच्या बाजूने धडक दिली. त्यानंतर मोठमोठ्याने आरडाओरडा केला. हा प्रकार टाळून कार चालक तरुण त्याची कार घेऊन पुढे गेला असता धडक देणा-या दोघांनी कारचा पाठलाग करून चालक तरुणाला मारहाण केली आणि जबरदस्तीने कार घेऊन गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) मारुंजी येथे घडली.

प्रवीण शंकर यादव (वय 22, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश हरिराम यादव (वय 26, रा. काळेवाडी), विशाल दामोदर पिल्ले (वय 24, रा. वाकड) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कारमधून मित्राला भेटण्यासाठी जात असताना भूमकर चौक अंडरपासच्या पुढे त्यांच्या कारला आरोपींच्या कारने समोरून धडक दिली. त्यानंतर आरोपींनी आरडाओरडा केला. त्यामुळे फिर्यादी त्यांची कार घेऊन पुढे गेले. आरोपींनी फिर्यादी यांचा पाठलाग केला. त्यांची कार अडवून फिर्यादी यांना मारहाण केली. जबरदस्तीने त्यांची दोन लाख रुपये किमतीची कार आरोपींनी नेली. ‘भूमकर चौकात ये. आमच्या गाडीचे नुकसान झाले आहे. त्याचे पैसे दे व तुझी कार घेऊन जा’ अशी आरोपींनी धमकी दिली.

फिर्यादी यांनी थेट पोलिसात धाव घेतली. पोलिसांना हा प्रकार सांगितला असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button