Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी- चिंचवडमध्ये ‘हिट ॲंण्ड रन’, रस्त्याच्या कडेला उभ्या महिलेला चिरडलं, व्हिडीओ व्हायरल

Pimpri-Chinchwad Hit and Run | पिंपरी-चिंचवडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका भरधाव कारने वृद्ध महिलेला उडवलं. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. कार चालकाने जाणीवपूर्वक महिलेला धडक दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. महिलेला धडक देऊन कार चालक पसार झाला आहे.
या अपघातामध्ये महिलेला जोरदार मुका मार लागला आहे. तिला उपचारानंतर डॉक्टरांनी घरी जाण्यासाठी मुभा दिलीय. मात्र महिलेला धडक देणारा चारचाकी वाहन चालक अपघात झाल्यानंतर फरार झाला होता. महिलेला धडक देणाऱ्या चारचाकी वाहन चालकाविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या वाहन चालकाचा शोध पिंपरी पोलीस घेत आहेत.





