राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज
![Heavy rains forecast for next three days in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/images-2022-03-06T074501.277.jpeg)
पुणे | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील २२ जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह ७ ते ९ मार्च या कालावधीत पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पाऊस होतो आहे. दुसऱ्या बाजूला उत्तरेकडे वाऱ्यांची चक्रीय स्थिती असल्याने या भागातही पावसाची शक्यता आहे. या सर्वाचा परिणाम राज्यावर होणार आहे. ७ मार्चला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात, तर ८, ९ मार्चला बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे.
पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे