पिंपरी / चिंचवड
पहिले लग्न ठेवले लपवून अन् निघाला दुसरी लगीनगाठ बांधायला : पोलिसांनी ठोकल्या बेड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/man-arrested.jpg)
पुणे l प्रतिनिधी
पहिले लग्न झालेले असताना त्याबाबत न सांगता दुसरे लग्न करण्यासाठी तयार झालेल्या नियोजित वराला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार नोव्हेंबर ते 28 डिसेंबर 2021 या कालावधीत बोपखेल येथे घडला.
सचिन जालिंदर गायकवाड (रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याचे पहिले लग्न झालेले आहेत. अरी देखील तो फिर्यादी महिलेसोबत दुसरे लग्न करण्यास तयार झाला. त्याने पहिल्या लग्नाबाबत फिर्यादी यांना काहीही सांगितले नाही. फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या इराद्याने तो फिर्यादींसोबत लग्न करण्यासाठी तयार झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.