कारची काच फोडून कागदपत्रे आणि रोकड चोरीला
![Theft](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/theft.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधून कागदपत्रे आणि एक लाख 90 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 26) दुपारी बारा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील बँक ऑफ बडोदाच्या समोर घडली.
विजयकुमार निळोबा मुंडकर (वय 55, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची कार पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे बँक ऑफ बडोदाच्या समोर पार्क केली होती. भर दिवसा दुपारी बारा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या कारची एक काच फोडली. त्यानंतर कारमधून बँकेची कागदपत्रे, फिर्यादी यांच्या पत्नीचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र आणि अंदाजे एक लाख 90 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.