पिंपरी / चिंचवड
प्रेमास विरोध केल्याने तरुणीचा विनयभंग, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
पिंपरी चिंचवड | रस्त्यामध्ये अडवून तरुणीला प्रेमासाठी प्रपोज केले. मात्र, तिने नकार दिला असता तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी काळभोरनगर पिंपरी येथे घडली.
आकाश भीमराव सावंत (वय 24, रा. सुदर्शन चौक लिलाबाई सावंत चाळ, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने गुरुवारी (दि. 29) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पीडित तरुणी काळभोर नगर पिंपरी येथून जात होती. त्यावेळी आरोपी आकाश याने तिला रस्त्यात अडवले व प्रेमासाठी प्रपोज केले. मात्र, तिने त्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी आकाश याने तिला शिवीगाळ करत विनयभंग केला. तसेच फिर्यादी व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.