मुलाविरोधात आईने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने बापाकडून छळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/crime-police-FIR.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
सावत्र मुलाच्या विरोधात आईने विनयभंगाची तक्रार दिली. त्या रागातून त्या महिलेचा पतीने छळ केला. तसेच तिच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 25 डिसेंबर 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत त्रिवेणीनगर, तळवडे येथे घडली.
याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 45 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने तिच्या सावत्र मुलाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा राग आरोपी पतीच्या मनात होता. त्या कारणावरून तसेच घरगुती कारणावरून फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गुमाणे तपास करीत आहेत.