‘हर घर तिरंगा’ अभियान : तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी या हेतूने घरकुल येथे प्रभातफेरी संपन्न
पिंपरी। महाईन्यूज ।
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान संदर्भात जनजागृती करण्यासाठी तसेच तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी याकरिता भव्य अशा प्रभातफेरीचे आयोजन राजश्री शाहू महाराज विद्यालय शरदनगर व सौ.कीर्ती मारुती जाधव यांच्या सौजन्याने करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक पारंपारिक वेशभूषेत ढोल लेझीम पथक लावण्यात आले होते. यावेळी वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली व भारतीय संस्कृती प्रमाणे सर्वांना झेंडे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राजश्री शाहू महाराज विद्यालयाचे सचिव लहू कांबळे सर, मुख्याध्यापक शिंदे सर व त्यांच्या सर्व शिक्षक वर्ग तसेच सौ. कीर्तीताई मारुती जाधव, सावंत काका, कदम साहेब, नितेश शेट्टी, अक्षय ओव्हाळ, संतोष पेहकर, अविनाश काळे, बबन पाहुणे, सुरज आढाव, धनंजय जाधव, सेफ शेख, सागर हुसळे, शुभम काळे व सर्व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.