कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी हनुमंत गावडे तर कार्याध्यक्षपदी महेश लांडगे यांची निवड
सरचिटणीसपदी संतोष माचुत्रे तर खजिनदारपदी दिलीप बालवडकर यांच्यावर जबाबदारी
![Hanumant Gawde elected as president of the wrestling association and Mahesh Landge as working president!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/PCMC-6-780x470.jpg)
पिंपरी | पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२४ ते २०२९ वर्षासाठी संघाच्या अध्यक्षपदी हनुमंत गावडे, तर कार्याध्यक्षपदी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यामध्ये या नियुक्त्या करण्यात आल्या. २०२४ ते २०२९ कालावधी करिता संघाची निवडणुक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ निवडणूक अधिकारी विलास कथुरे यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक पार पडली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्ष, हनुमंत गावडे, कार्याध्यक्षपदी महेश लांडगे, उपाध्यक्षपदी विशाल कलाटे, सरचिटणीसपदी संतोष माचुत्रे तर खजिनदार म्हणून दिलीप बालवडकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे सर्व जेष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष माचुत्रे, यांनी केले. आभार काळूराम कवितके यांनी मानले.