Ground Report । भोसरी विधानसभा मतदार संघात इरफान सय्यद मैदानात!
विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार ब्रँडिंग : शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीवर दावा
![Ground Report. Irfan Syed Maidan in Bhosari Assembly Constituency!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Irfan-Sayyad-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून ओळख असलेले कामगार नेते व शिवसेना शिंदे गटाचे उपनेते इरफान सय्यद यांच्या समर्थकांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
इरफान सय्यद यांचा दि. १७ जून रोजी वाढदिवस आहे. या पिंपरी-चिंचवडसह भोसरी विधानसभा मतदार संघात जोरदार फलकबाजी करण्यात आली आहे. या मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे आहेत. महायुतीच्या जागावाटपामध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी, अशी सय्यद यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे जिल्ह्यात असंधटीत कामगारांचे मोठे नेटवर्क, तरुणांमध्ये त्यांची क्रेझ आहे. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे कामगारांचे मोठे जाळे आहे. त्यांनी मोठा कामगार वर्ग जोडून ठेवला आहे. उत्तम संघटन कौशल्याच्या जोरावर कार्यकर्ते, कामगार वर्गाची मोठी फळी त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीत इरफान सय्यद यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.