मोशी प्राधिकरण येथे भव्य सामूहिक अग्निहोत्र सोहळा
भाजपा मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पुढाकार

परिसरातील नागरिकांना अध्यात्मिक मेजवानी
पिंपरी-चिंचवड: मोशी प्राधिकरण येथील त्रिवृक्ष संगम दत्त मंदिरात आगामी रविवार, ९ नोव्हेंबर रोजी भव्य सामूहिक अग्निहोत्र व चैतन्य पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्याचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष श्री. शिवराज सुदामराव लांडगे करणार आहेत.
शिवराज लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट यांच्या आज्ञेनुसार स्थापन झालेल्या दिव्य गुरुपीठावरून परमसदगुरू श्री गजानन महाराज यांनी सर्वांच्या कल्याणासाठी ‘नित्य अग्निहोत्र’ करण्याचा शुभसंदेश दिला आहे. लांडगे यांनी या धार्मिक उपक्रमातून समाजातील प्रत्येक घरात अग्निहोत्र करण्याची प्रेरणा दिली आहे.
हेही वाचा – हिंदुभूषण क्रीडामहोत्सव-२०२५ अंतर्गत ‘सोसायटी प्रीमियर लीग’

सोहळा संध्याकाळी ४:३० वा. सुरू होईल, तर महाप्रसाद संध्याकाळी ५:३० ते ८:०० वा. उपलब्ध राहणार आहे. मार्गदर्शनाचे कार्य डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रम निःशुल्क असून सर्व उपस्थितांना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. शिवराज लांडगे यांनी सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी यावर विशेष भर दिला आहे आणि नागरिकांना एकत्र येऊन अध्यात्मिक अनुभव घेण्यास प्रोत्साहित केले आहे.
कार्यक्रमात मा. श्री. महेशदादा किसनराव लांडगे (आमदार, भोसरी विधानसभा) आणि सौ. निलम शिवराज लांडगे (अध्यक्षा, इंद्रायणी महिला प्रतिष्ठाण) उपस्थित राहणार आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
भव्य सामूहिक अग्निहोत्र सोहळा केवळ धार्मिक विधी नाही, तर समाजातील प्रत्येक घरात अध्यात्मिक ऊर्जा प्रसारित करण्याची संधी आहे. घराघरात अग्निहोत्र करण्याने केवळ वैयक्तिक कल्याण होत नाही, तर समाजातील एकात्मता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. या कार्यक्रमातून नागरिकांना एकत्र येऊन मन, घर आणि समाज या तीनही स्तरांवर शांती, समृद्धी आणि सुसंवाद साधण्याची प्रेरणा मिळेल. मला विश्वास आहे की या प्रकारच्या अध्यात्मिक उपक्रमांमुळे समाजाची मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल आणि प्रत्येकाच्या जीवनात नवीन प्रेरणा निर्माण होईल.
– शिवराज लांडगे, मंडलाध्यक्ष, भाजपा.




