‘गोपीनाथजी मुंडे साहेबांचा जीवनप्रवास प्रेरणादायी’; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप
भाजपा पक्ष कार्यालयात मुंडे साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-2024-06-03T170313.841-780x470.jpg)
पिंपरी : माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी शंकर जगताप यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. गोपीनाथजी मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आजही आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे, तसेच त्यांच्या विचारांचे पाईक होणे ही खरी आदरांजली ठरेल, अशी भावनाही जगताप यांनी व्यक्त केली.
यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, माऊली थोरात, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, बेटी बचाव बेटी पढाओ प्रकोस्थ संयोजिका प्रीती कामतीकर, अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी गणेश ढाकणे, रोजगार, स्वंरोजगार व कौशल्य विकास सक्षमीकरण आघाडी अध्यक्ष भारत मदने, माजी नगरसेवक बाळासाहेब भुंबे, युवा मोर्चा सरचिटणीस सतीश नागरगोजे, जिल्हा चिटणीस मंगेश धाडगे, संयोजक जैन प्रकोष्ठ संदेश गादीया, बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक मनोजकुमार मारकड, सुनील वाठ आदी उपस्थित होते.
हेही वाचा – ‘प्लॅनेटरी परेड’ निमित्त पिंपरी चिंचवड तारांगण येथे आठवडाभर ‘खास शो’
याप्रसंगी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला तिस-यांदा विजय मिळाल्याबददल आनंद व्यक्त करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन विकसित भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देणा-या अरुणाचल प्रदेशमधील सर्व मतदार बांधवांचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आभार मानले. तसेच, अरुणाचल प्रदेशमधील नागरिकांचे, लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय पक्षप्रमुख मा. जे.पी.नड्डाजी, मुख्यमंत्री मा. पेमा खांडूजी, अरुणाचल भाजपा प्रदेशाध्यक्ष बीयूराम वाघेजी आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली अरुणाचल प्रदेशात भाजपा सरकार जनकल्याणासाठी भक्कमपणे काम करेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.