पाणी द्या…अन्यथा अधिकाऱ्यांना प्रभागात फिरकू देणार नाही : तुषार कामठे
पिंपरी : अनियमित व कमी दाबाने दुषित पाणी पुरवठ्याच्या विरोधात पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटे वस्ती, वाकड येथील असंख्य महिलांनी आज मंगळवारी (दि. २८) रोजी पालिकेच्या गेटवर हंडा मोर्चा नेला. महिलांनी ” आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे’, ‘जागे व्हा जागे व्हा, प्रशासन जागे व्हा’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक तुषार कामठे, प्रभागातील महिलावर्ग आदींनी पालिका आयुक्तांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले.
तुषार कामठे म्हणाले, गेल्या ५ वर्षापासुन परिसरात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. आंदोलन व उपोषण करून देखील हा प्रश्न सुटला नाही. माझ्या करदात्या नागरीकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून ही कृत्रिम पाणीटंचाई होत आहे. नागरीक कोंडीत सापडले आहे. येणाऱ्या काळात पाणी सुरळीत न झाल्यास पाणीपुरवठा अधिकारी, लाईनमॅन यांना माझ्या प्रभागात फिरकू दिले जाणार नाही.