ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी गौरव शर्मा
![Gaurav Sharma as the President of Rotary Club of Akurdi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/IMG_20210817_120724-e1629271753649-1.jpg)
पिंपरी चिंचवड | रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी 2021-22 साठी गौरव शर्मा यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे सचिवपदी रामेश्वर लाहोटी व खजिनदार पदी जिग्नेश आगरवाल यांची निवड करण्यात आली आहे.पिंपरी येथे झालेल्या पदग्रहण समारंभात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा यांच्या हस्ते गौरव शर्मा व त्यांच्या संचालक मंडळाने कार्यभार स्वीकारला. या कार्यक्रमात ‘रोचक’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर शीतल शहा, पास्ट प्रेसिडेंट गूल सेवलानी, संतोष आगरवाल, विजय तारक यांच्यासह रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे सर्व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आगरवाल व आनंदिता मुखर्जी यांनी केले.