शिक्षण विश्व: लेझीमच्या प्रात्यक्षिकांमधून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण!
अभिषेक विद्यालयम्; प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
![Freedom fighters remembered through Lezim's demonstrations](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Republic-Day-in-Abhishek-Vidyalaya-Shahunagar-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड | अभिषेक विद्यालय शाहूनगर येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
तसेच, डंबेल्स व रिंग्स यांचा वापर करून प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी लेझीमच्या प्रात्यक्षिकांमध्ये विविध स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा परिधान करून सादरीकरण केले, तसेच देशभक्तीपर समूहगीत सादर केले. निबंध स्पर्धेच्या माध्यमातून माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान , भारताची अस्मिता या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा : अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला येणार PM Kisan योजनेचा १९ वा हप्ता
कार्यक्रमास शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका गीता चरंतीमठ, सचिवमनीषा कसबे, गायत्री चरंतीमठ यांच्यासह सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका, पालक वर्ग व विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.