शिरीषआप्पा साठे सोशल फाउंडेशनतर्फे नागरिकांना होणार मोफत पाणी पुरवठा
![Free water supply to citizens through Shirishappa Sathe Social Foundation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Image-2021-12-12-at-2.02.41-PM.jpeg)
– लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
पिंपरी ,प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपळे निलख येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीस शिरीषआप्पा साठे यांच्या पुढाकाराने पिंपळे निलख विशालनगर, कस्पटे वस्ती येथील रहिवाशांना दररोज दोन लाख लिटर मोफत पाणी पुरवठा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे .
आज सकाळी पिंपळे निलख येथून या स्तुत्य उपक्रमास सुरुवात झाली .राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते व नगरसेवक नाना काटे, पीसीएमसीचे माजी चेअरमन दिलीप बालवडकर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्यामभाऊ जगताप, ऑल इंडिया काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, विश्वास जपे साहेब ,श्रीकांत पाटील, दत्तोबा नांदगुडे ,संजय साठे ,शंकर तांदळे, दादासाहेब टकले, राजेंद्र टकले ,मनोज अग्रवाल, प्रमोद नितनवरे ,वसंत तांबे, जयवंत कवितके आदींसह फाउंडेशनचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसादिनी नागरिकांसाठी मोफत पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी २लक्ष लीटर (वीस टँकर)पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन यावेळी शिरीषआप्पा साठे यांनी दिले . फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.