पिंपरी / चिंचवड

ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून 21 लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देतो, असे सांगून एकाची 21 लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै 2021 रोजी फिर्यादी यांच्या घरी ऑनलाइन पद्धतीने घडली.

गोपाल व्यंकट राजू (वय 48, रा. पदमजी पेपर मिल समोर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय (मोबाईल क्र. 7284922908) आणि हितेश (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगणमत करून फिर्यादी यांना एसएमएस केला. अस्तित्वात नसलेल्या Tradeshotfx कंपनीत फॉरेक्‍समध्ये पैसे गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास बसावा म्हणून इतर लोकांना फायदा झाला असल्यासागे स्क्रीनशॉट पाठवले. फिर्यादी यांनी आरोपी यांच्या वेबसाईटला भेट दिली असता तिथे सुद्धा लोकांना चांगला फायदा होत असल्याचे कमेंटवरून दिसून आले. त्यामुळे फिर्यादी यांचे केवायसी डॉक्‍युमेंट पाठवून फिर्यादी यांचे ऑनलाईन खाते उघडले. त्याद्वारे फिर्यादी यांच्याकडे पैसे गुंतवले व त्यावर परतावा मिळाल्याचे भासविले. फिर्यादी यांना वेगवेगळ्या बॅंक खात्यामध्ये एकूण 21 लाख 66 हजार रुपये भरण्यास भाग पाडून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button