आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून चार पाण्याचे टँकर
![Four water tankers from MLA Laxman Jagtap's local development fund](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/jagtap.jpg)
पिंपरी चिंचवड | चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब, ड,ग आणि ह या चार प्रभागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा सोयीकरिता चार पाण्याचे टँकर देण्यात आले.वाकड येथील ओमेगा पॅरेडाइज् सोसायटी शोनेस्ट टॉवर येथे हा कार्यक्रम झाला. आहे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास 9 हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकरचे वितरण आमदार जगताप यांच्या हस्ते व महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रभाग अधिकारी श्रीनिवास दांगट, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नगरसेविका झामाबाई बारणे, सुनीता तापकीर, सुरेश भोईर, हर्षल ढोरे, गोपाळ मळेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक विनायक गायकवाड, राम वाकडकर, विशाल कलाटे यांनी केले. टँकरमुळे वाकड भागातील नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा करता येणार आहे. पाणी पुरवठा करण्याचा प्रश्न कमी होणार आहे.