आगीमध्ये चार दुकानं जळून खाक; तीन जण किरकोळ जखमी

पिंपरी : चिंचवड मध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास नेहरू नगर येथील झिरो बॉईज चौकात गादी बनवणाऱ्या कारखान्याला आणि फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली. या घटनेत दुकानाच्या वर असलेल्या इमारतीतील तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहरूनगर मधील झिरो बॉईज चौकात पाचच्या सुमारास भीषण आग लागल्याची वर्दी मिळाली. अग्निशमन दलाची दोन वाहन घटनास्थळी दाखल झाली होती. तसेच तीन व्यक्ती अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जात होत होती. त्यांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
हेही वाचा – काळजी घ्या! पुण्यात आढळले उष्माघाताचे ‘इतके’ रुग्ण; आरोग्य विभागाचा नागरिकांना सावधानतेचा इशारा
किरकोळ जखमी असलेल्या तिघांना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. आगीच रौद्ररूप बघता एकूण नऊ अग्निशमनची वाहन घटनास्थळी पोहोचली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात आले. अखेर एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आल आहे. या आगीमध्ये चार दुकानात जळून खाक झाली आहेत. तसेच दुकानाच्या वर असलेल्या इमारतीला झळ पोहचली आहे.