Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक तानाजी वाल्हेकर यांचे निधन
![Former Pimpri-Chinchwad Municipal Corporation corporator Tanaji Walhekar passed away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/tanaji-valhekar.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक तानाजी शंकर वाल्हेकर यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. मनसेचे नेते सुनिल वाल्हेकर, बिल्डर भरत वाल्हेकर यांचे ते थोरले बंधू होते.
१९९७ मध्ये महापालिकेत वाल्हेकरवाडी प्रभागातून ते निवडूण आले होते. महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ताथवडे गावच्या विकास आराखड्यात त्यांचे योगदान होते. परिसरातील विविध संस्था संघटनांचे आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी भागात दांडगा जनसंपर्क होता.