नितीन गिलबिले खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! माजी नगरसेवक मास्टरमाइंड?

पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली वरमुखवाडी परिसरात व्यावसायिक नितीन गिलबिले यांचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी तीन हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या होत्या. पण आता नितीन गिलबिले हत्याकांडात मोठा ट्विस्ट आला आहे. या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड एक माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. किसन तापकीर असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. त्यानेच नितीन गिलबिले यांची हत्या घडवून आणली, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
या पूर्वी पोलिसांनी अमित जीवन पठारे (वय ३५, रा. पठारेमळा, चऱ्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोळू, ता. खेड) आणि सुमीत फुलचंद पटेल (वय ३१, रा. गायकवाडनगर, दिघी) अशा तीन जणांना अटक केली होती. या या सगळ्यात माजी नगरसेवक किसन तापकीर यांचंही नाव समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीत त्रुटींचा भडिमार; ३ दिवसांत ३,३४३ तक्रारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेतील आरोपींनी माजी नगरसेवक किसन तापकीर यांचं नाव घेतल्याचं पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. अद्याप तापकीर सापडले नसून दिघी पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत आहे. जमिनीच्या व्यवहारातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.





