breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अन्नदान म्हणजे जिवनदान, यातुनच भारतीय संस्कृतीचे जतन – आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी / महाईन्यूज

आपल्या जवळील अन्नातील भुकेलेल्यांना अन्न देणे हि संस्कृती, भुक असताना अन्न ग्रहण करणे ही प्रकृती तर पोट भरलेले असताना अन्न ग्रहण करणे हि विकृती आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत अनेक संस्था थांबलेल्या असताना भुकेलेल्या  कष्टकरी बांधवांना महीनाभरापासून  अन्न वाटप करून कष्टकरी संघटनेने ही संस्कृतीतून कर्तव्य जपले आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

वर्किंग पिपल्स चार्टर , कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने सुरू असलेल्या अन्न वितरण  कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, सचिन नागणे, उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष महेश स्वामी, अशोक तनपुरे, धर्मेंद्र पवार, उमेश डोर्ले, महिला प्रमुख माधुरी जलमुलवार, वृषाली पाटणे, रानी माने, अर्चना कांबळे, सुमन अहिरे, नम्रता जाधव, संजीवनी शिरसाठ, अशा सालवे, राजु बोराडे, अतिश वडमारे  आदी उपस्थित होते.

आयुक्त  पुढे म्हणाले ” बौद्ध धर्म  असो जैन  धर्म, ईस्लाम असो भारताची शिकवंण मोठी आहे आदर्श आहे, मराठीत अस म्हणतात अन्नदाता सुखी भव, त्यामुळे अशा कार्यात कधी कमी पडणार नाही. कोरोना लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या हाताला काम आणि भुकेल्या पोटाला अन्न मिळत नसल्याने कष्टकरी कामगारांचे व गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत असल्याने भुकेल्या जीवांचे पोट भरावे या सामाजिक भावनेतुन “चार घास सुखाचे” या उपक्रमाच्या माध्यमातुन दररोज शहरातील तीन हजार कष्टकरी कामगार व गरजुंना जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम सुरु आहे. असंघटित कामगार क्षेत्रातील बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षाचालक, टपरी पथारी, दिव्यांग नागरिक  व इतर गरजुंची भुक भागावी, त्यांच्या पोटाला आधार मिळावा यासाठी  गेल्या महिन्याभरापासुन शहरातील निगडी, आकुर्डी, चिंचवड, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, चिखली व इतर परिसरात मागणीनुसार त्याचे वितरण केले जाते .

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button