Fitness certificate : ‘वायसीएम’च्या आवारातच सोशल डिस्टंन्सिंगचा उडाला बोजवारा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखता रोखता डॉक्टरांच्या नाकीनऊ आले आहे. वायसीएम रुग्णालयाच्या आवारातच सोशल डिस्टंन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला आहे. गावी जाण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट घेण्याकरिता रुग्णालयाच्या आवारात रांगा लावून उभे राहिलेले नागरिक आपापसात सुरक्षित अंतर ठेवत नसल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जाहीर केलेल्या Lockdown मुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. पिंपरी-चिंचवडमधून गावी जाणा-या नागरिकांना वायसीएम रुग्णालयाच्या आवारातच फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येत आहे.
याठिकाणी नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे. यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे वायसीएमच्या आवारातच सोशल डिस्टंन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला आहे.
नागरिकांनी फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी कोवीड १९ वायसीएम रुग्णालयात येण्याची गरज नाही. कारण, गावी जाणा-या नागरिकांना ते राहत असलेल्या परिसरातील खासगी रुग्णालयात फिटनेस सर्टिफिकेट मिळू शकेल. तसे निर्देश नुकतेच देण्यात आले आहेत.
राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिष्ठाता,