हॅरीस ब्रिज येथील नदीपात्रात पडलेल्या तरुणाला अग्निशमन जवानांकडून जीवदान
![Firefighters rescue young man who fell into a riverbed at Harris Bridge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/हॅरीस-ब्रिज-येथील-नदीपात्रात-पडलेल्या-तरुणाला-अग्निशमन-जवानांकडून-जीवदान.jpg)
पिंपरी : दापोडी पुल (हॅरीस ब्रिज) येथे नदीपात्रात पडलेल्या इसमाला वाचवण्यात पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी (दि.१५) रोजी दापोडी पुल येथे नदीपात्रात एक इसम अंदाजे (वय ३२) पडल्याची माहिती पिंपरी येथील अग्निशमन दलाला मिळाली. घटनेचे गांभीर्य पाहता अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी जवानांना एक इसम नदीपात्राच्या मधोमध गुडघाभर पाण्यात अडकल्याचे निर्दशनास आले.
मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात उतरून इसमाला सुरक्षितपणे नदीपात्राच्या बाहेर काढले. अंधार असल्याकारणाने बचाव कार्यात अडथळा येत असतांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय कुशलपणे इसमाचा वाचवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांना माहिती देत इसमाला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात रवाना केले.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे फायरमन सारंग मंगरूळकर, भूषण येवले वाहनचालक, रुपेश जाधव, वाहनचालक, रोकडे, ट्रेनी फायरमन, सिद्धेश दरवेश, विकास दाभाडे, सुक्र, ट्रेनी सब ऑफिसर अभिजित पाटील, सिद्धेश बोडके, चव्हाण आदींनी या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. अग्निशमन दलाच्या जवानांचे परिसरात कौतुक होत आहे.