Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीतील १२ मजली इमारतीला आग; पाच ते सहा जणांची सुटका

अग्निशामक दलाची सतर्कता: शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

पिंपरी-चिंचवड | बोराडेवाडी, मोशी येथील १२ मजली इमारतीमध्ये आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग इमारतीच्या आठव्या मजल्यावरील डक्टमधून गेलेल्या इलेक्ट्रिक वायरला लागल्याचे समजते.

आग लागल्यानंतर इमारतीत धुराचे लोट पसरले आणि काही नागरिक अडकले. घटनास्थळी तात्काळ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी वेळेवर हस्तक्षेप करून इमारतीत अडकलेल्या पाच ते सहा जणांची सुरक्षितपणे सुटका केली.

हेही वाचा   :    Pahalgam Terrorist Attack | “मुस्लीम म्हणून लाज वाटतेय”; पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायक संतापला 

अग्निशामक दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी सुरू असून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट ही कारणीभूत असू शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button