Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

Pahalgam Terrorist Attack | “मुस्लीम म्हणून लाज वाटतेय”; पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायक संतापला

Pahalgam Terrorist Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या क्रूर हल्ल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध बॉलिवूड गायक सलीम मर्चंटने एक भावनिक व्हिडीओ पोस्ट करत आपला राग आणि दुःख व्यक्त केलं आहे.

सलीम मर्चंट काय म्हणाला?

सलीमने आपल्या व्हिडीओत पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवताना इस्लामच्या शिकवणीचा उल्लेख केला. तो म्हणाला, “पहलगाममध्ये ज्या निष्पाप लोकांची हत्या झाली, ती फक्त यासाठी की ते हिंदू होते, मुस्लीम नव्हते. हे हत्यारे मुस्लीम आहेत का? नाही, ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाम असं काही शिकवत नाही. कुराण शरीफच्या सूरह अल-बकराहच्या आयत २५६ मध्ये स्पष्ट लिहिलंय की, धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही. मला मुस्लीम म्हणून लाज वाटतेय की मला हा दिवस पाहावा लागतोय, जिथे माझ्या निष्पाप हिंदू बहीण-भावांना फक्त हिंदू असल्यामुळे क्रूरपणे मारण्यात आलं. हे सगळं कधी संपणार?”

हेही वाचा   :    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवलीतील तिघांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

सलीमने काश्मीरमधील स्थानिकांच्या अडचणींवरही भाष्य केलं. तो म्हणाला, “काश्मीरमधील लोक, जे गेल्या २-३ वर्षांपासून थोडं सुखात जगत होते, त्यांच्या आयुष्यात पुन्हा तीच संकटं येऊन ठेपली आहेत. मला खरंच कळत नाहीये की मी माझं दुःख आणि राग कसं व्यक्त करू. ज्या निर्दोष लोकांनी आपले प्राण गमावले, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना शक्ती आणि समृद्धी देवो. ओम शांती.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button