breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी येथील टायरच्या गोदामाला भीषण आग; परिसरात धुराचे लोट
महापालिका अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल
![Fire breaks out at tire godown in Pimpri; Smoke in the area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-19-2-780x470.jpg)
पिंपरी : एम्पायर इस्टेट इमारतीच्या मागील बाजूस भीषण आग लागली. ही घटना बुधवारी (दि. २१) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.टायरच्या गोदामाला आग लागली असल्याचे म्हटले जात आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
✅ पिंपरी येथील टायरच्या गोदामाला भीषण आग
महापालिका अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल pic.twitter.com/ZX6MysiT9h
— Mahaenews (@mahae_news) February 21, 2024
हेही वाचा – ‘आंदोलनाची तारीख ठरली की विषय संपला’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असून धुराचे लोट आकाशात उडत आहेत. दरम्यान या धुरामुळे एम्पायर इस्टेट आणि ऑटो क्लस्टर तसेच समोरवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.