breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘आंदोलनाची तारीख ठरली की विषय संपला’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी विधेयक मंजूर करून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र, या विधेयकावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्षेप घेतला आहे. आधीच्या अधिसूचनेची सरकारने अंमलबजावणी केली नसल्याचं सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकांना सांगण्यासारखं काय केलं तुम्ही? अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही. काल विशेष अधिवेशन बोलावलं पण, अंमलबजावणी केली नाही. आमच्या लोकांचा काही फायदा झाला नाही. तुम्हाला वाटत असेल की निर्णय घेऊन तुम्ही मोठे होता. पण जनता तसं म्हणत नाही. तसेच, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय निवडणुका घेऊ शकत नाहीत. या आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यावर ते निवडणुका घेऊ शकतात. पण आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नाही, असं ते म्हणाले.

हेही वाचा       –        HSC Exam | बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर शिक्षकांचा बहिष्कार 

आता आम्हाला किती खुशी व्हायला पाहिजे होती. आपल्याला इथून ५ किमीवर जायचं असेल आणि एखाद्याने मोटारसायकल दिली तर आपण किती खूष होतो मोटरसायकल दिली म्हणून. तुम्ही मोटरसायकल देऊनही आम्ही नराज कसं काय? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. म्हणजे तुम्ही अंलबजावणी केली नाही. याच आरक्षणासहित तुम्ही सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली असती तर पंधरा दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. साबणाने घासलं असतं तरी अंगावरचा गुलाल निघाला नसता. छाती ठोकून सांगतो गुलाल निघाला असता, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आता तरी सायकल समज आली तर बरं होईल. अजूनही सरकारकडे १-२ दिवसांचा वेळ आहे. एकदा का आंदोलनाची वेळ ठरली, की विषय संपला. २०१८ मध्ये निवडणुकीच्या आधी उच्च न्यायालयात मराठा आरक्षण दिलं होतं. तेव्हा त्यांना फायदा झाला होता. परंतु ते आरक्षण नंतर रद्द झालं. पण तेच आरक्षण पुन्हा दिलं. त्यावेळी मतं घेतली पण टिकलं नाही. त्यामुळे आता लोकांच्या लक्षात आलं आहे. आता सरकारने शहाणं व्हावं, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button