breaking-newsपिंपरी / चिंचवड

अग्निशमन व आपत्कालीन सेवा शुल्क नवीन धोरणाची अंमलबजावणी करा : माजी विरोधी पक्षनेता नाना काटे

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन : गृहनिर्माण संस्थांना फीच्या नावाखाली भुर्दंड नको

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील बांधकामांना परवानगी देताना आकारण्यात येणाऱ्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी चे दर कमी करणेबाबत व नवीन महाराष्ट्र राज्य शासनाच्या आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक सुधारणा आदेशाची महापालिकेने अंबलबजावणी करावी अशी मागणी आयुक्तांना माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील ४५ मीटर व ४५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या बांधकामांना परवानगी देताना वार्षिक आग सुरक्षा निधी म्हणून जी अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी आकारण्यात येतो. तो खूप असून यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांना व गृहरचना संस्थाना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. मुळात सध्य स्तिथीत आपल्या महापालिकेतर्फे आकारण्यात येणारी अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी हे राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक यांच्यापेक्षा खूप जास्त असून यामध्ये मोठी तफावत आहे.

यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही गोष्टीचा विचार करून त्वरित सुधारणा करावी. या बाबतचे आदेश पारित करावा व यासंबंधी नुकताच राज्य शासनाने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक फी सुधारणा आदेश दि. ८ जून २०२३ रोजी पारित केला आहे. त्याची अध्याप अंबलबजावणी महापालिकेने देखील केलेली नाही. तरी पालिकेने आकरण्यात येणाऱ्या फी संरचनेमध्ये सुधारणा करून राज्य शासनाचा आदेशाची अंबलबजावणी करावी. तसेच शहरातील बांधकाम व्यावसायिकांना व गृहरचना संस्थाना फीच्या नावाखाली वर्षाला बसणाऱ्या आर्थिक भुर्दंडातून मुक्तता करावी, अशी मागणी नाना काटे यांनी निवेदनात दिले आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button