विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या लोकांसह पतीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/dr-ashton-what-to-do-sexual-assault-rape.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पती अविनाश सुरेश घोणसे, दीर, अभिजित सुरेश घोणसे, मावस दीर गणेश पांचाळ, सासू, जाऊ आणि पतीची मैत्रीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा लहान मुलगा आणि मुलीसोबत मिळून सासरी उदगीर, हैदराबाद आणि वडमुखवाडी येथे राहत असताना आरोपींनी विवाहितेला त्रास दिला. कौटुंबिक वादाच्या कारणावरून, तसेच पतीचे दुस-या मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधास विवाहितेचा विरोध होता, त्यामुळे दुसरे लग्न करण्यासाठी घटस्फोट देण्याची फिर्यादी संमती देत नसल्याने आरोपींनी त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली. वेळोवेळी फिर्यादीला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा छळ केला. जीवे मारण्याची धमकी देऊन पतीने विवाहितेला शारीरिक सुखापासून वंचित ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विद्या माने तपास करीत आहेत.