पिंपरी / चिंचवड

परस्पर पेट्रोल विकल्याप्रकरणी पेट्रोल पंपावरील कामगारावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

पेट्रोल पंप मालकाच्या परस्पर 32 हजारांचे पेट्रोल, डिझेल विकून त्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना डिसेंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2022 या कालावधीत इंद्रायणीनगर भोसरी येथील बाबर पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर घडली.

संजय राजाभाऊ पुजारी (वय 27, रा. जुनी सांगवी. मूळ रा. परळी वैजनाथ, बीड) असे अटक केलेल्या आरोपी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी श्रीराज यशवंत बाबर (वय 28, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय पुजारी हा फिर्यादी यांच्या पेट्रोल पंपावर काम करत होता. त्याने डिसेंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2022 या कालावधीत 32 हजारांचे पेट्रोल व डिझेल परस्पर विकले. त्या पैशांचा पुजारी याने अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पुजारी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत साकोरे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button