breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दोन गटात चिंचवड पोलीस ठाण्यासमोर टोळक्याची तुफान हाणामारी…
![Fighting in front of Chinchwad police station ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/marhan-40_201906251791.jpg)
- पोलिसांकडून तब्बल १३ जणांवर गुन्हा दाखल…
पिंपरी |
चिंचवड पोलीस ठाण्यासमोर हाणामारी केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती.
अजित संतोष कांबळे (वय २५), सचिन भिकाजी ताकपिरे (वय ३५), सनी नागेश वाघमारे (वय २१), साहिल व्यंकटेश वर्मा (वय १९), विकी नागेश वाघमारे (रा. काळेवाडी), शोएब इरशाद शेख (रा.पिंपरी), पंकज सुहास पाटील, संदीप रामचंद्र घोडके (वय ३७, रा. चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सागर धनंजय कांबळे, अलका धनंजय कांबळे, कुसूम भिकाजी ताकपिरे, सुधा सुहास पाटील तसेच एक अल्पवयीन मुलगी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.