Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आयपीएलमधील सर्वात मोठा ट्रेड? संजू सॅमसन चेन्नईकडे जाण्याची शक्यता

IPL 2026 Trade Window | आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी खेळाडू रिटेन्शनची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ट्रेड विंडो खुली असून संघांमध्ये खेळाडूंची देवाणघेवाण जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मोठा ऐतिहासिक ट्रेड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्या बदल्यात ट्रेडची चर्चा सुरू आहे. संजू सॅमसन चेन्नईकडे येऊ शकतो, तर राजस्थानला रवींद्र जडेजासोबत सीएसकेचा सॅम करन किंवा मथीशा पथिराना यांपैकी एक खेळाडू मिळू शकतो. हा करार झाल्यास आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या ट्रेडपैकी एक ठरणार आहे. तथापि, दोन्ही फ्रँचायझींकडून अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

हेही वाचा     :          ‘टॅरिफ’ला विरोध करणारे लोक मूर्ख आहेत; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

माहितीनुसार, या करारावर अद्याप स्वाक्षरी झालेली नसली तरी चर्चेचा अंतिम टप्पा सुरू आहे. जडेजाबरोबर दुसरा कोणता खेळाडू राजस्थानकडे जाणार हे निश्चित झाल्यानंतर, १५ नोव्हेंबरच्या रिटेन्शन डेडलाइनपूर्वी हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एका मुलाखतीत सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी सांगितलं होतं की, आम्हाला अजूनही आशा आहे की धोनी पुढील हंगामात खेळेल. पण, सॅमसन संघात आल्यास मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button