breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपळे गुरव येथे कमर्शियल सिलेंडरमधून गॅस चोरी करताना स्फोट

पिंपरी l प्रतिनिधी

कमर्शियल गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करताना गॅस लिकेज होऊन स्फोट झाला. त्यामध्ये दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज (बुधवारी, दि. 8) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे मुख्य केंद्र आणि रहाटणी उपकेंद्र असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाने घटनास्थळावरून एक पाच किलो आणि दुसरा 14 किलोचा गॅस सिलेंडर जप्त केला आहे.

पिंपळे गुरव येथे राजकृष्ण मंगल कार्यालयाच्या जवळ मोरया कॉलनी क्रमांक पाच येथे एका घरात जखमी दोघेजण मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे, धोकादायकरित्या गॅस काढून त्याची चोरी करत होते. गॅस काढताना झालेल्या हलगर्जीपणामुळे गॅसच्या व्हेपरला आग लागली आणि भडका उडाला. या भडक्यामुळे घराच्या भिंती पडल्या आणि दोघेजण किरकोळ जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button