ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
गॅस लिकेज झाल्याने स्फोट; चौघे जखमी
पिंपरी चिंचवड | गॅसचा रेग्युलेटर सुरू राहिल्याने गॅस लिकेज होऊन झालेल्या स्फोटात चौघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 23) सद्गुरुनगर, भोसरी येथे घडली.मिळालेल्या माहितीनुसार, सद्गुरुनगर भोसरी येथील हनुमंत कॉलनीमध्ये सोनवणे कुटुंब रहात आहे. सोमवारी सोनवणे यांच्या घरातील गॅसचा रेग्यूलेटर सुरू राहिला. त्यामुळे घरात गॅस लिकेज झाला. दरम्यान गॅसच्या शेजारी असलेल्या देव्हाऱ्यात देवाचा दिवा लावला होता. देव्हाऱ्यातील दिव्यामुळे लिकेज झालेल्या गॅसचा भडका झाला. यामध्ये घरातील चारजण जखमी झाले आहेत.
याबाबत अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाकडे या घटनेची माहिती नाही. भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटनेतील जखमींची नावे समजू शकली नाहीत.