breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अत्यावश्यक सेवांना शनिवारी आणि रविवारी मुभा, परंतु सकाळी सात ते अकरा पर्यंतच

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अत्यावश्यक सेवांची दुकाने आठवड्यातील शनिवारी आणि रविवारी देखील सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू ठेवता येतील, असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केला आहे.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कोविड १९ ला प्रतिबंधित करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांना शहरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवांना निर्बंध घातले आहेत. यापुढे देखील हा आदेश कायम राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा शनिवारी आणि रविवारी सुरू ठेवता येणार आहेत. यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास बंदी होती. ती आता उठवण्यात आली आहे. यासंबंधित आयुक्तांनी नुकताच आदेश जाहीर केला आहे.

अत्यावश्यक सेवा 

किराणा, भाजीपाला, फळ विक्री दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थाची दुकाने (मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकानांसह) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी), पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थांसाठी साहित्याची निर्मिती करणारी दुकाने, चष्म्याची दुकाने, उर्वरित अत्यावश्यक सेवा आठवड्यातील सर्व दिवशी सकाळी सात ते आकरा या वेळेत सुरू राहतील.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button