ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी जनसंवाद पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मिशन- PCMC : जनतेशी थेट संवादातून विकासाचा संकल्प, भाजपच्या पदयात्रेने प्रचाराला गती

पिंपरी-चिंचवड | भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनसंवाद पदयात्रेला चिखली परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे उमेदवार सुरेश (तात्या) म्हेत्रे, गणेश दत्तात्रय मळेकर, सौ. सोनम विनायक (आबा) मोरे व सौ. शितल यादव यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली.

ही पदयात्रा चिखली येथील श्री गणेश मंदिरापासून उत्साहात सुरू झाली असून पाटीलनगर येथे तिचा समारोप झाला. पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प यावेळी मांडण्यात आला.

पदयात्रेत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘कमळ’ चिन्हाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पहार घालून व जल्लोषात उमेदवारांचे स्वागत केले. चिखली व पाटीलनगर परिसरातील वाढता जनसमर्थन पाहता भाजप प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. या जनसंवाद पदयात्रेमुळे प्रभागात भाजपच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून उमेदवारांच्या विजयाचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा     :        भोसरीतील गवळीनगरमध्ये भाजपच्या चारही उमेदवारांची भव्य पदयात्रा 

यावेळी बोलताना उमेदवार सुरेश (तात्या) म्हेत्रे म्हणाले, “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. जनसंवाद पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता, नागरिकांचा भारतीय जनता पार्टीवर आणि आमच्या पॅनेलवर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट होत आहे. विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

तर गणेश दत्तात्रय मळेकर यांनी सांगितले, “जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याला आमचे प्राधान्य असेल. चिखली व पाटीलनगर परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मतदार नक्कीच आम्हाला कौल देतील.”

“प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्या प्राधान्याने सोडवून चिखली व पाटीलनगरचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”

– सुरेश (तात्या) म्हेत्रे, उमेदवार,भाजपा.

“प्रत्येक नागरिकाच्या अडचणी ऐकून त्यावर वेळेत आणि प्रभावी उपाययोजना करणे हेच आमचे ध्येय आहे. पारदर्शक कारभार, नियोजनबद्ध विकास आणि सुरक्षित भविष्य देण्यासाठी आम्ही प्रभागाच्या सेवेत सदैव तत्पर राहू.”

– गणेश दत्तात्रय मळेकर, उमेदवार, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button