Entertainment : चिंचवडच्या मा. नगरसेवकाचा हिंदी गाण्यावर भन्नाट ‘डान्स’, अभिनेत्यालाही मागे टाकले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Screenshot_20200301-194707-1.png)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका माजी नगरसेवकाचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आकुर्डी चिंचवड इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित कार्यक्रमाच्या भव्य व्यासपीठावर नगरसेवकाने सादर केलेल्या खुमासदार नृत्याने प्रेक्षकांना सुध्दा नाचण्याचा मोह आवरता आला नाही. हिंदी चित्रपट श्रृष्टीतील एखाद्या नामांकीत अभिनेत्याला सुध्दा लाजवेल अशा हिंदी गाण्यावर चिंचवडच्या माजी नगरसेवक महोदयांनी कलेचे सादरिकरण केले.
आकुर्डी चिंचवड इंग्लिश मीडियम स्कूलचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह अन्य नामांकीत व्यक्तींनी देखील या कार्यक्रामाला हजेरी लावली. शाळेच्या कर्मचा-यांनी नृत्य सादर करण्याची विनंती करताच माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्यातला अभिनेता जागृत झाला. शाळेच्या या खुल्या व्यासपीठावर ओ जाना.. दिल लगाना रे.. ओ जाना… या खूमासदार हिंदी गातावर शेट्टी यांनी स्वतःमधल्या अभिनेत्याला दडपणाच्या आवरणातून मुक्त केले. त्यांच्यासोबत अन्य यजमानांनी देखील चित्रपटात अख्खी हयात घालविणा-या नामांकीत कलाकारांना लाजवेल असा डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ ”महाईन्यूज”च्या हाती लागल्याने तो न्युजबध्द झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना विकासकामांत योगदान देणारे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्यात कलाकार दडलेला होता, याची साधी कल्पना सुध्दा कोणाला नव्हती. मात्र, त्यांनी काल शनिवारी (दि. 29) शाळेच्या कार्यक्रमात सादर केलेल्या डान्समुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. चित्रपट श्रृष्टीतील कलाकारांनी देखील त्यांच्या नृत्याची दखल घ्यावी, असे त्यांनी सादरीकरण केले. त्यांच्या कलेची सर्वत्र चर्चा होत आहे.